कोंढवा । फातिमानगर येथील उन्नती व्हेइकल्समध्ये नवीन रेनॉल्ट कॅप्चरचे आगमन झाले. रेनॉल्ट कंपनीने नवीन फीचर्स असलेली रेनॉल्ट कॅप्चरा लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 9.99 लाख असून या गाडीचे 1.5 एच 4 के पेट्रोल, 1.5 के 9 के डिझेलमध्ये 3 प्रकार उपलब्ध आहेत. एक्स-ट्रोनिक्स आधुनिक इंजिन, ड्युअल एअरबॅग, मजबूत मोनोकोक बॉडी, उत्कृष्ट मायलेज, स्टँडर्ड उपकरण अशा 50पेक्षा अधिक प्रिमियम सुिंवधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून एकूण 59 नवीन कार्सचे आतापर्यंत बुकिंग झाले आहे. बुकिंग सुरू असल्याची माहिती उन्नतीचे प्रवीण कुमार यांनी सांगितले. यावेळी नाकोडा मशिनरीज प्रा. लि. सीएमडी कमलेश जैन उपस्थित होते.