उन्नाव प्रकरण: भाजपचे माजी आमदार कुलदीप सेगरला दहा वर्षाचा कारावास

0

लखनौ: उत्तर प्रदेशातील भाजपातून निलंबित केलेले माजी आमदार कुलदीप सिंह सेनगरला उन्नाव बलात्कार पिडीतेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले होते. यावेळी न्यायालायने त्याला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवले होते.

बलात्कारप्रकरणी न्यायालयाने त्याला आधीच शिक्षा सुनावली असून सध्या तो जेलमध्ये आहे. गेल्या आठवडय़ात या प्रकरणाचा निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने निकाल जाहीर करत ११ आरोपींपैकी कुलदीप सेनगर व इतर सहा जणांना दोषी ठरवले. उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल २०१८ मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.