जळगाव – उन्हाळ्याचा चटका लागण्याची सुरुवात जळगाव जिल्हात झाली आहे. कडक उन्ह, गरमीत स्वत : ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. अशा वातावरणात थोडासा ही बेजावदारपणा घातक ठरू शकतो. यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या. शरीरात पाणी कमी पडल्यामुळे अनेक व्याधी जडल्या जातात.
या दिवसात खुप थंड असे पदार्थ खाण्याची इच्छा होते जसे की, आइसक्रीम, गोळा यावकडे लक्ष जादा जाते. मात्र यापासून हानी होऊ शकते. यासाठी हे ५ पदार्थ खाणे अतिशय गरजेचे आहे.
लिंबू : उन्हाळ्याच्या दिवसात लिंबूचा वापर खुप फायदेशीर आहे असे मानला जातो. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याने फक्त उकाड्यापासून संरक्षण मिळते असे नाही तर आतून ताजेपणा ठेवण्यास मदत होते.
टरबूज :टरबूजचे पाणी हे चांगले मानले जाते. यामध्ये 90 टक्के पाणी असते. जे तुमच्या शरीरा सोबत त्वचेला हाइड्रेट करण्यास मदत करेल.
नारळ पाणी : यामध्ये खुप पोषक तत्वे असतात. याच्या वापरामुळे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून वाचता येईल. उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पानीमुळे पाण्याची कमतरता भरून काढता येते.
दहीः दही उन्हाळ्यात गारवा निर्माण करत. याला रोज तुमच्या डाइटमध्ये समावेश करा. यात फाइबरचे प्रमाण अधिक असते. जे पोट हेल्दी ठेवण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्या : आरोग्याला फायदेशीर मानल्या जातात. मात्र उन्हाळ्यात भोपळा, लौकी. टिंडे, आणि बीन्स या भाज्यांचे वापर शरीराला गारवा देण्यास मदत होते. सोबत पोषक तत्वे ही भरून काढतो.
सलाड : उन्हाळ्यात सलाडचा जादा वापर करा. यात गाजर, टोमॅटो, आपली आवडती भाजीचा समावेश करू शकता.