उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

0

धुळे। शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन संलग्नीत शटलर्स बॅडमिंटन अकॅडमीतर्फे दि.9 ते 20 मे दरम्यान उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर क्युमाईन क्लबमधील बॅडमिंटन हॉलमध्ये भरविण्यात येत आहे. हे शिबिर सकाळी 7 ते 10 या वेळेत घेण्यात येणार आहे. शिबिरात बॅडमिंटन खेळाचे महत्व, नियम, बेसिक तसेच अँडव्हान्स प्रशिक्षण देण्यात येईल व तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिरात योगा व आहार या गोष्टींवरदेखील मार्गदर्शन करण्यात येईल. इच्छूक खेळाडूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे शहर व बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डी.व्ही. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी द्वारका फोटो स्टूडिओ, संपर्क साधावा.