भुसावळ- उन्हाळ्यामुळे रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी पाहता मुंबई ते शालिमार दरम्यान विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 02041 मुंबई-शालिमार एक्स्प्रेस 20 एप्रिल ते 29 जूनदरम्यान चालवण्याचा निर्णय घेणयात आला आहे. ही गाडी नाशिक स्थानकावर शनिवारी दुपारी 2.57 ला येईल तर भुसावळ स्थानकावर सायंकाळी 6.10, अकोला 8.27 वाजता पोहोचेल नंतर बडनेरा, नागपुर, रायपूरमार्गे शालिमार पोहोचल तर गाडी क्रमांक 02042 शालिमार-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस 22 एप्रिल 1 जुलैदरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी बडनेरा स्थानकावर ही गाडी पहाटे साडेचार वाजता आल्यानंतर अकोला येथे सहा वाजता, भुसावळ येथे सकाळी 8.20 वाजता, नाशिक स्थानकावर सकाळी 11.35 वाजता पोहोचेल. रेल्वे सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.