भुसावळ । तीन मंत्र्यांसह माजी मंत्री व खासदार, आमदारांच्या उपस्थितीत सोमवार, 14 रोजी सकाळी 9.30 वाजता शहरातील नूतन पोलीस उपअधीक्षक कार्यालयास नियंत्रण कक्ष व तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन होत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होईल तर अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर विशेष उपस्थिती सहकार मंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रसंगी राहणार आहे.
तीन कार्यालयांचे कामकाज
जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरासमोर पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह तालुका पोलीस ठाणे व नियंत्रण कक्षाचे कामकाज एकाच इमारतीत सुरू होणार आहे. प्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, विधान परीषद सदस्य चंदूभाई पटेल, नगराध्यक्ष रमण भोळे यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.