उपचारादरम्यान जळीत विवाहितेचा मृत्यू

0
जळगाव – तीन महिन्यापुर्वी स्टोव्हच्या भडक्याने 35 टक्के भाजलेल्या तांबापूरा येथील विवाहितेचा गुरूवारी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान राहत्याघरी मृत्यू झाल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, जागृती पवन सुरवाडे (वय-25) रा. गौतम नगर, तांबापूरा यांचे तीन महिन्यापुर्वी स्टोव्हच्या भडक्याने 35 टक्के जळाल्या होत्या. त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना महिनाभरानंतर घरी पाठविण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर घरी आणि सुरत येथील नातेवाईकांकडे उपचार सुरू होते. गुरूवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. मयत विवाहितेचा दिर किरण विजय सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.