उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

0

जळगाव । प्रकृति खालावल्याने मंगळवारी मध्यरात्री प्रौढास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार घेत असतांना रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रौढाचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व.वा.वाचनालय परिसरातील रहिवासी चंद्रशेखर प्रभाकर जाट (वय-45) यांची मंगळवारी 16 रोजी मध्यरात्री अचानक प्रकृति खाल्यावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांचे शालक उज्वल पद्माकर बल्लाळ यांनी उपचारार्थ दाखल केले होते. परंतू, उपचार घेत असतांना मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.