उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

0

जळगाव – दोन्ही पायाने अपंग असलेल्या महिलेचे गेल्या आठदिवसांपासून पोटात दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली जामनेर तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या आशा समशेर तडवी (वय-30) त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी आणि आई आहेत. जिल्हापेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.