जळगाव – बांभोरी येथील वयोवृद्ध शहराकडे येत असतांना चक्कर येऊन पडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली असून दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, रमेश यादव डोळे (वय-55) रा. बांभोरी ता. धरणगाव हे अपंग होते. सोमवारी आपल्या तीनचाकी सायकलने येत असताना रस्त्याच्या कडेला उभे असतांना अचानक चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना रस्त्याने जाणार्यांना लक्ष्यात आल्याने त्यांनी खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांपासून उपचार सुरू असतांना गुरुवार सकाळी 7 वाजता निधन झाले.