जळगाव ।लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत दर्जी फाऊंडेशनची विद्यार्थीनी निलम बाफना ही उपजिल्हाधिकारी पदासाठी मुलींमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
निलम भरत बाफना खुल्या प्रवर्गात मुलींमध्ये पहिली आहे. पाचोरा येथील रहिवाशी निलम बी.ई. मेकॅनिकल विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या 5 जागा असतांना तिला हे यश मिळाले आहे. दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा, राम पवार, प्रविण पाटील, सतिश देशमुख आदींनी तिचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवितांना बघून 1998 पासून सुरूवात केलेल्या चळवळीला आता खान्देशात उभारी मिळालेली असल्याचे दर्जी म्हणाले.