शहादा । येथील गणेश सोनवणे यांची नंदुरबार येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजं जिल्हा युवा संघटना उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. क्षत्रीय अहिर जिल्हा समाज युवा कार्यकारिणीची मिटिंग अ. भा. युवक संघटना उपाध्यक्ष दिनेश नेरपगार यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. समाजातील चाली रिती व समाज संघटन यावर भर देत विविध समाज उपयोगी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गजेंद्र शिंपी, प्रवीण चित्ते यांनी देखील मनोगत व्यक्त केले. गणेश सोनवणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली. सुत्रसंचालन वैभव उखदेकर यांनी तर प्रास्ताविक व आभार अंकुश खैरनार यांनी मानले.