उपनगराध्यक्ष युवराज लोणारींचा राजीनामा

0

नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार ; पिंटू कोठारींना संधी ?

भुसावळ– कुंडलीत राजयोग नसलेल्या नगरसेवक युवराज लोणारींना प्रभारी का असेना एक महिन्यापुरता प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार मिळाला व त्यांनी महिनाभराच्या काळात दोन सर्वसाधारण सभेत अनेक धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. ठरल्याप्रकाणे लोणारी यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकार्‍यांकडे राजीनामा दिला तर नगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा रमण भोळे यांनी स्वीकारली. गेल्या महिन्याभरात युवराज लोणारी यांच्या कार्यकाळात दोन सर्वसाधारण, एक स्थायी, एक अर्थसंकल्पीय स्थायी व एक विशेष सभा घेण्यात आली. या सभांमधून शहराच्या विविध विकासात्मक कामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पिंटू कोठारींना मिळणार संधी
पालिका निवडणूकीनंतर भाजपच्या नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे. यातील एक अर्थात लोणारींना संधी मिळाली. आता पुढील संधी चारमधून कोणत्या नगरसेवकांना मिळेल? याबाबत शहरात उत्सुकता वाढली आहे. सध्या शेख सईदा शफी व निर्मल कोठारी यांचे नाव आघाडीवर आहे मात्र भाजपचे पक्षश्रेष्ठी ठरतील त्यांनाच संधी मिळणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.