मुंबई । मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी उपनगरीय लोकल वाहतूक रामभरोसे सुरू आहे, असे सध्याचे वातावरण आहे. त्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे दर रविवारी मेगा ब्लॉकच्या माध्यमातून या दुरुस्त्या केल्या जातात. मात्र रेल्वे रुळांमधील दुरुस्त्यांचे प्रमाण तुलनेने वाढत आहे, त्याचा परिणाम थेट लोकल गाड्यांच्या वेगावर होऊ लागला आहे. ही दुरुस्ती मुख्यतः दोन दिशेचे रूळ जेव्हा एकाच रुळामध्ये जोडले जातात, नेमक्या त्याच पॉइंटला अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नादुरुस्तींची 487 संख्या
जानेवारी ते जुलै 2017 या कालावधीत या प्रकारच्या नादुरुस्तींची संख्या 487 इतकी होती, तर रुळाखालील खडी निघाल्याने रूळ नादुरुस्त झाल्याच्या घटना 230 घडल्या आहेत. 70 टक्के प्रकार ही खडी निघून दोन रूळ जोडणार्याद पॉईंटमध्ये अडकण्याचे प्रकार जास्त आहेत. 230 प्रकारांपैकी 54 प्रकार हे कल्याण विभागात झालेत, 19 ठाणे, 15 वडाळा आणि 8 प्रकार हे अंबरनाथ, कर्जत या ठिकाणी झाले. आहेत.