जळगाव । विशेष सभेत उपमहापौरपदाची निवडणूक महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावर घेण्यात आली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, महापौर ललित कोल्हे तसेच नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. उपमहापौर निवडीची प्रक्रीया सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी यांनी उमेदवारांची नावे वाचून दाखविली. यावेळी खाविआचे गणेश बुधो सोनवणे तीन अर्ज यांचे दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले. छाननीनंतर तीघसही अर्ज वैध ठरविण्यात आल्याने 11 वाजून 5 मिनीटांनी माघारीसाठी 15 मिनीटांची वेळ देण्यात आली. पंधारा मिनीटांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गणेश बुधो सोनवणे यांची बिनविरोध उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांना विरोधी भाजपनेही पाठींबा दिला.
निवडीनंतर कोल्हेंनी 7, शिवाजीनगर या सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महापालिकेवर शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा पाठींबा आहे.
यांनी केले अभिनंदन
गणेश बुधो सोनवणे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच सभागृहाबाहेर फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर उममहापौर निवडीनंतर सुरेशदादा जैन यांचे बंधू व खाविआ’चे नेते रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विष्णु भंगाळे, श्यामकांत सोनवणे, नगरसेवक सुनील महाजन, कैलास सोनवणे, नितीन बरडे, दत्तात्रय कोळी, साजीदखान पठाण, संदेश भोईटे, मिलींद सपकाळे, जितेंद्र मुंदडा, बंटी जोशी, चेतन शिरसाळे, भाजपा गटनेते सुनील माळी, ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, रविंद्र पाटील, शुचिता हाडा, नवनाथ दारकुंडे आदी सदस्यांनी सोनवणे यांचा अभिनंदन केले.
एकमेव अर्ज
आज उपमहामहापौर निवडणूकीत खानदेश विकास आघाडीचे श्री. सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. यापदासाठी भाजपनेही त्यांना पाठींबा देत ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. श्री. गणेश सोनवणे हे गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. मात्र या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांनी खानदेश विकास आघाडीत प्रवेश केला. आघाडीतर्फे गणेश सोनवणे यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे.
सोनवणेंनी व्यक्त केल्या भावना
गणेश सोनवणे यांनी खाविआचे नेते सुरेशदादा जैन व रमेशदादा जैन यांचे आभार मानले. जैन परिवाराचा प्रत्येक कार्यकर्त्यांकडे लक्ष असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. निष्ठेचे फळ मिळाले असल्याची भावना सोनवणे यांनी व्यक्त केली. सुरेशदादांंच्या हातातील सोन्याची कुर्हाड मला मिळाली असल्याचे सांगून दादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सत्ता मिळाली असली तरी सुरेशदाद जैन, रमेशदादा जैन, बॉडी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गकाढणार. यात अमृत योजनेचे रखडलेले काम दादांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यावर भर देणार आहे.
25 वर्षांपूर्वी गणेश सोनवणे यांना बँकेत नोकरी दिली होती. परंतु, त्यांनी ती सोडून समाजकरण करण्यावर भर दिला. तसेच जेष्ठतेनुसार त्यांना गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांना असलेले कायद्याचे ज्ञान हे वाखणण्याजोगे आहे. सुरेशदादांनी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. त्यांचा अनुभव पाहूनच दादांनी त्यांना संधी दिली आहे.
-रमेशदादा जैन .