जळगाव । महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचार्यांनी महिला विक्रेत्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार घेवून हॉकर्स महिला उपमहापौर ललित कोल्हे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उपमहापौरांनी अतिक्रमण निर्मुलन कर्मचार्यांची बैठक बोलविली होती. याबैठकीला नगरसेवक अनंत जोशी, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, प्रभाग समिती अधिक्षक उदय पाटील, अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. शहरातील चारही प्रभागांसाठी स्वंतत्र अतिक्रमण निमुर्लन पथक असावे अशी मागणी नगरसेवक अनंत जोशी यांनी केली होती. परंतु, या पथकांना एकाच ठिकाणी ठेवण्यात यावे अशी अपेक्षा नगरसेवक जोशी यांनी व्यक्त केली. चार दिवस हे सर्व कर्मचारी एकत्र अतिक्रमण काढतील व उर्वरीत दोन दिवसात त्यांच्या प्रभागात काम करतील असा तोडगा निघाला.