उपमहापौरांनी घेतला जलकुंभ स्वच्छतेचा आढावा

0

जळगाव। गेल्या चार महिन्यापासून शहराला दूषित पाणी पुरवठा होत होता. याबाबत आलेल्या तक्रारीवरून उपमहापौर ललित कोल्हे यांनी जलकुभांची पाहणी करून पाणी पुरवठा विभागाला जलकुंभाच्या स्वच्छता व टाक्यांची स्थितीचा अहवाल व ड्राय डे चे वेळापत्रक मागितले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत उपमहापौरांनी पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेवून जलकुंभाच्या स्वच्छता, दुरुस्तीसाठी लवकर प्रक्रिया राबविण्याच्या सुचना केल्या आहे. उपमहापौर ललित कोल्हे यांच्या दालनात सायंकाळी दूषित पाण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक अनंत जोशी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डि. एस. खडके तसेच पाणी पुरवठा विभागाचे सर्व अभियंता व प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

टेंडर प्रक्रियाद्वारे स्वच्छतेचा प्रस्ताव
बैठकीत सर्व जलकुंभाच्या अहवालाची माहिती तसेच स्थिती अभियंत्यांकडून जाणून घेतली. यावेळी जलकुंभाच्या स्वच्छता करण्यासाठी मनपाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने स्वच्छतेचे टेंडर काढण्याची आवश्यकता आहे. खासगी मक्तेदार काम दिल्यावर ड्राय डे असलेल्या दिवसात पूर्ण काम करता येवू शकते असे सांगितले. यावेळी उपमहापौर कोल्हे यांनी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवून जलकुंभाच्या ड्राय डेच्या वेळापत्रक नुसार जलकुंभाच्या स्वच्छतेचे वेळापत्रक तयार करा असा सांगितले. जलशुद्धीकरण केंद्रातील सॅन बेल्ट, मिक्सर प्लॅन्ट, व्हॉल दुरुस्ती करण्याची गरज आहे.