उपमहापौर पदासाठी सोनवणेंचा एकमेव अर्ज

0

जळगाव । महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीच्या गणेश सोनवणे यांनी नगरसचिव यांच्याकडे तिन नामनिदर्शन पत्र दाखल केलीत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा वगळता महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती. अर्ज सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवशी सोनवणे यांचा ऐकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. बुधवारी (दि.13) होणार्‍या सभेत या निवडीव शिक्कामोर्तब होणार आहे. तर अर्ज सादर करतांना पदाधिकारी उपस्थिती होते.

13 रोजी विशेष सभा
जळगाव महापालिकेच्या महापौरपाचा नितिन लढ्ढा यांनी राजिनामा दिल्यनातंर माजी उपमहापौर ललित कोल्हे यांची व महापौरपदी सर्वपक्षीय पाठींब्यावर निवड झाली. त्यानतंर रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी दि.13 बुधवारी विशेष सभा होत आहे. त्यासाठी निवडीची प्रकीया सुरु करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी ठरल्यानुसार खान्देश विकास आघाडीचे गणेश सोनवणे यांनी तिन अर्ज दाखल केलेत.

असे केले अर्ज दाखल
महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे हे तिनही अर्ज दाखल करण्यात आले. पहील्या अर्जात सूचन म्हणून नितिन लढ्ढा, अनुमोदक म्हणून संदेश भोईटे, दुसर्‍या अर्जात सूचक म्हणून रमेश जैन अनुमोदक म्हणून कीशोर पाटील तर तिसर्‍या अर्जात सूचक म्हणून मनसेचे महापौर ललित कोल्हे व अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे उपस्थित होते.

यांची उपस्थिती
गणेश सोनवणे यांचा अर्ज सादर करण्यासाठी मनसेचे महापौर ललित कोल्हे, नगरसेवक अनंत जोशी, संतोष पाटील, खावआचे नेते रमेश जैन, माजी महापौर नितिन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनिल महाजन, नगरसेवक कैलास सोनवणे, शामकांत सोनवणे, स्थायी सभापती वर्षा खडके, ज्योती इंगळे. जनक्रांतीचे सुनिल पाटील, राजेश शिरसाठ, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, संदेश भोईटे, राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, दुर्गेश पाटील, अतुल बारी उपस्थित होते.