उपमुख्यमंत्री अजित पवार ‘वर्षा’वर दाखल; राजकीय घडामोडींना वेग !

0

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आले आहे. उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपची कसोटी लागणार आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असल्याने त्यांचाच व्हीप लागू होईल असा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र व्हीप कोणाचा लागू होईल हे हंगामी अध्यक्षच ठरवणार आहे.

आजच हंगामी अध्यक्षांची निवड होईल, त्यासाठी १० जणांचे नाव पुढे आहे. राज्यपालांकडे १० जणांचे नावे पाठविण्यात आले आहे.