BREAKING: उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तर आदित्य ठाकरे कॅबिनेटची शपथ घेणार !

0

मुंबई: आज ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दुपारी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दरम्यान राजभवनाकडून मंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आले आहे. यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील कॅबिनेटची शपथ घेणार आहे. आदित्य ठाकरे शपथ घेणार असल्याने शिवसेनेवर टीका होऊ शकते.

आज शिवसेनेकडून १३, राष्ट्रवादीकडून १४ तर कॉंग्रेसकडून १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.