भारताच्या कॅगपदी गिरीश चंद्र मुर्मू

0

नवी दिल्ली: बुधवारी ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी मनोज सिन्हा यांची उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सिन्हा यांनी आज ७ रोजी शपथ घेतली. दरम्यान उपराज्यपाल पदाचा राजीनामा देणाऱ्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्यावर मोदी सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. भारताच्या कॅग (कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) पदी मुर्मू यांची निवड करण्यात आली आहे.

मुर्मू हे गुजरात केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २९ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांची जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदी निवड करण्यात आली होती. उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.