उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी जदयुचा यु टर्न

0

पाटणा । देशाच्या राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आघाडीचे पारडे जड वाटत असले तरी उपराष्ट्रपती निवडणुकीत मात्र चुरस होण्याची चिन्हेआहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये क्रॉस वोटींगची निर्माण झाल्याने चुरशीची चिन्हे आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआच्या रामनाथ कोविंद पाठिंबा देणारा संयुक्त जनता दल उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांना पाठिंबा देणार आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष ज्या उमेदवाराची निवड करतील, त्या उमेदवाराला संयुक्त जनता दलाकडून पाठिंबा दिला जाईल, असे संयुक्त जनता दलाचे महासचिव के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांच्या नावाला पसंती देण्याचा निर्णय नितीश कुमार यांचा निर्णय हा अपवादात्मक होता. मात्र आम्ही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकता भंग पावू देणार नाही. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा 17 विरोधी पक्षांची बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने उमेदवाराची निवड व्हायला हवी.
– के. सी. त्यागी, प्रवक्ते, जदयु