रावेर शहरात लोकप्रतिनिधींच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा
रावेर – सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवत रस्त्यांसंदर्भात लोकप्रतिनिधींनी खुर्चीपुढे निवेदन ठेवले. रावेर शहरालगत नगरपालिका हद्दी बाहेरून जाणार्या उटखेडा-भाटखेडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडल्याने ये-जा करणार्या लोकांसह वाहनधारकांना प्रवास करण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात संबंधित विभागाने दखल घ्यावी यासाठी बुधवारी नगरसेवक अॅड.सुरज चौधरी, नगरसेवक सुधीर पाटील, आरोग्य सभापती शेख सादिक, माजी नगरसेवक अॅड.योगेश गजरे, युवाशक्ति फाऊंडेशनचे पंकज चौधरी, अकील शेख, राहुल पाटील, परेश चौधरी, अमोल कासार, अनिल पाटील, सोनू अग्रवाल, शुभम नमायते आदींनी अधिकार्यांच्या खुर्चीला हार घालून अनोखी गांधीगिरी केली.
अधिकारी नसल्याने खुर्चीला घातला हार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एक उपविभागीय अधिकारी तर तीन शाखा अभियंता यांच्यापैकी कुणीही उपस्थित नसल्याने शेवटी शहरातील लोकप्रतिनिधींनी रस्त्यासंदर्भातील निवेदन व हार खुर्चीला घालून मनमानी पद्धत्तीने काम करणार्या अधिकार्यांच्या कार्यपद्धत्तीचा निषेध नोंदवला.