बारामती । निरावागज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभांगी ज्ञानदेव बुरुंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुनम हेमंत देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली बुरुंगले यांची निवड करण्यात आली. उपसरपंच शीतल भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने बुरुंगले यांना उपसरपंचपदाची संधी देण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक कार्येकर्ते गणपतराव देवकाते, अॅड. हेमंत देवकाते, मदनराव देवकाते, गुलाबराव देवकाते, राजेंद्र देवकाते, प्रकाश देवकाते, राम देवकाते, राजेंद्र बुरुंगले, विशाल देवकाते, मोहन धायगुडे, भालचंद्र देवकाते, पोपटराव बुरुंगले, ज्ञानदेव बुरुंगले, रमेश बुरुंगले आदी उपस्थित होते.