उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाजच बांगलादेशचे लक्ष्य

0

लंडन । आयसीसी चॅम्पियन स्पर्धेत भारत व बांगलादेश उपात्यसामना खेळण्यासाठी उभेे ठाकणार आहे. बांगलादेश आजपर्यंत चॅम्पियन ट्रॉफीत कधीच उपांत्य फेरीपर्यंत पोहचलेला नाही.यापुर्वी चॅम्पियन ट्रॉफीच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशावर 240 धावांनी नोंदविला आहे.फायनल फेरीत जाण्यासाठी संधी दोन्ही संघाला आहे.यासंधीचा फायदा घेण्यासाठी बांगलादेशाने भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी रणनिती आखली जात आहे.बांगलादेशच्या चाहत्यांनी आक्षेपार्ह पोस्टर माध्यमातून हल्ला चढवित आहे.तर भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी रणनिती करित आहे.
आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये होणार्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतावर दबाव आणण्याची रणनिती आहे. भारताची फलंदाजी जबरदस्त फॉर्मात असल्याने बांगलादेशची चिंता वाढली आहे.भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा-शिखर या जोडी लवकर फोडून फलंदाजीसाठी येणार्‍या कर्णधार विराट कोहलीवर दडपण आणण्याची बांगलादेशची व्यूहनिती आहे.त्यामुळेच सलामीवीरांना लवकर गुंडाळून भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा बांगलादेशचा मनसुबा आहे. मात्र हे डावपेच मैदानावर प्रत्यक्षात येणे अतिशय अवघड दिसते आहे.

बांगलादेशाकडून कर्णधार मश्रफी मुर्ताझा, तस्कीन अहमद, रुबेल हुसेन आणि मुस्तफिजुर रेहमान यांना घेवून गोलंदाजांचा वेग आणि आक्रमकता यांच्या जोरावर वरचढ ठरण्याची रणनिती बांगलादेशने आखण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे प्रमुख प्रशिक्षक चंडिका हाथुरुसिंघा संघाच्या रणनितीमध्ये जातीने लक्ष घालत आहेत. बांगलादेशचा संघ भारतीय संघाला नमवेल, अशी आशा हाथुरुसिंघा यांना आहे. भारतीय संघ पूर्णपणे दबावाखाली असल्याचा त्यांनी केला आहे. बांगलादेशचा संघ कधीही आयसीसीकडून आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा संघ उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर होता. मात्र मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 109 धावांनी धुव्वा उडवला होता.