उपायुक्त खोसेंनी पदभार स्विकारला

0

जळगाव । महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर पुणे पिंपरी-चिंचवड मनपाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत खोसे यांची नियुक्ती झाली आहे. उपायुक्त श्री. खोसे यांनी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेटल्यानंतर प्रभारी उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार यांच्याकडून घेतला. गेल्या सहा महिन्यापासून जळगाव महापालिकेतील उपायुक्तपदी रिक्त होते. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन व महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.