उपायुक्त चंद्रकांत खोसेंना निलंबित करा

0

जळगाव : महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीची सभा 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या समितीचा राजीनामा देऊनही मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांना सभेचा अजेंडा प्रशसनातर्फे देण्यात आला होता. याची विचारणा करण्यासाठी श्री. नन्नवरे हे उपायुक्त खोसे यांच्याकडे गेले असता त्यांनी अपमनास्पद वागणुक दिली असल्याचा आरोप करीत उपायुक्तांना निलंबित करावे अशी मागणी श्री. नन्नवरे यांनी महापौर ललित कोल्हे यांच्याकडे केली.

प्रशासकीय अधिकार्‍यांकडून लोकप्रतिनिधीला खालच्या पातळीची वागणुक देणे हे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचा आरोप नितीन नन्नवरे यांनी यावेळी केला आहे. महापौरांनी चौकशी समिती नेमून तसेच महासभेत या विषयांवर विचारात घेऊन सर्वानुमते उपायुक्त तसेच वृक्षप्राधिकरण समितीचे अध्यक्ष खोसे यांच्यावर निलंबलनाची कारवाई करावी.