उपुल थरंगाची कर्णधारपदी निवड

0

कोलंबो । श्रीलंकेच्या संघातील वरिष्ठ फलंदाज उपुल थरंगाकडे रविवारपासून सुरू होणार्‍या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील सहा डावांमध्ये थरांगाला 88 धावाच करता आल्या होत्या. या मालिकेत श्रीलंकेचा 0-3 असा दारूण पराभव झाला होता. जुलै महिन्यात मायदेशात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत झिंम्बावेने श्रीलंकेचा 3-2 असा पराभव केला होता. या पराभवामुळे अ‍ॅजेलो मॅथ्यूजने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर संघाच्या नेतेपदाची जबाबदारी उपुल थरंगाकडे सोपवण्यात आली होती. भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अँजेलो मॅथ्यूजला संघात कायम ठेवण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचे तीन सामने खेळलेल्या श्रीलंकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.

श्रीलंकेचा संघ
उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निराशेन डिक्वेला, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, चामरा कापुगेदरा, मिलींडा सिरवर्दाना, मिलींडा पुष्पकुमार, अकिला धनंजय, थिसारा परेरा, लक्श्मण संदाकन, थिसारा परेरा, वानिनडु हसारंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामिरा, विश्‍व फर्नांडो.

वेगवान गोलंदाज नुआन प्रदीप आणि अष्टपैलू असेला गुणरत्ने दुखापतींमुळे संघाच्या बाहेर आहेत. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा आणि डावखूरा फिरकी गोलंदाज मलिंडा पुष्पकुमाराची संघात निवड करण्यात आली आहे. हे दोघेही नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळले होते. श्रीलंकाने भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय क्रिकेट मालिका नोव्हेंबर 2014-15 मध्ये खेळली होती. भारतात झालेल्या या मालिकेत श्रीलंकेचा 0-5 असा पराभव झाला होता.