उपेंद्र कुशवाह यांनी दिला राजीनामा; महाआघाडीत होऊ शकतात सामील

0

नवी दिल्ली- २०१९ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहे. दरम्यान बिहारमधील जागा वाटपावरून नाराज असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी आज कॅबीनेटचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. उपेंद्र कुशवाह महाआघाडीत सहभागी होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

उद्यापासुन संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. कुशवाह यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्याची जबाबदारी होती.

संबंधित बातमी-उपेंद्र कुशवाह एनडीएला ठोकू शकतात रामराम !