शिरपूर। तालुक्यातील बलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सन 2014 – 2015 या कालावधीत झालेला शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कार्यवाही व पात्र लाभाथ्यारना अनुदान या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील व माधव फुलचंद दोरीक हे मागील चार दिवसापासुन पंचायत समिती शिरपूर कार्यालया बाहेर आमरण उपोषनास बसले असुन आज त्यांचा उपोषनाचा सहावा दिवस होता. मात्र यात पंचायत समिती प्रशासन आंदोलन कारणार्यांना समर्पक उत्तर न दिल्यामुळे व गुन्हे दाखल करण्याची मागणी पुर्ण न केल्यामुळे उपोषण कर्ते आंदोलनावर ठाम असुन हे आंदोलन सुरु असल्यामुळे ते चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. उपोषणास बसलेल्या डॉ. सरोज पाटील व माधव दोरीक यांची 25 रोजी अचानक प्रकृती खालवल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा दाखल करण्यात आले.
उपचारास नकार
डॉ. सरोज पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला असुन दोरीक यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र आंदोलन कर्ते यांनी परत आज उपचार सोडून उपोषण स्थळ गाठले त्यामुळे प्रशासना समोर गंभिर प्रश्न चिन्ह उभे राहीले आहे. दरम्यान सदर प्रकारात आम्ही कार्यवाहीसाठी चौकशी करत आहोत हे दर्शवण्यासाठी पंचायत समितीचे गट किवस अधिकारी व संबधित कर्मचारी हे बलकुवा, कुवे व मुखेड येथे जाऊन चौकशी करत होते.
ग्रामसेवकांचा दारु पिऊन धिंगाना
पंचायत समितीचे शिष्ठ मंडळ उपोषण कर्त्याना संबंधीत ग्रामसेवकवर 2 तरखेनंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र उपोषण कर्त्यांनी नकार दिला. दरम्यान सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ग्रामसेवक सुर्यवनशी हा दारू पिऊन उपोषणकर्त्याना शिवीगाळ करत होता. माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तर कोणालाही सोडणार नाही अशा भाषेत धमकी देत होता. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक विरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.