उपोषणामुळे खड्डे भरण्यास सुरवात

0

म्हसळा : दिघी पोर्ट मधून होणार्‍या बेकायदेशीर ओव्हरलोड लोह व कोळसा वाहतुकीमुळे दिघी-म्हसळा-माणगाव रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरवात झाली आहे. हे खड्डे चांगल्या दर्जाचे भरले जातील, अशा लेखी आश्वासनानंतर शिवसेना नेते तथा माजी सभापती महादेव पाटील यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार रामदास झळके यांच्या हातून सफरचंदाचा रस पिऊन आपले आमरण उपोषण सोडले. नागरी वाहतुकीच्या कमी क्षमता असणार्‍या रस्त्यावरून दिघी पोर्ट ओव्हरलोड लोह व कोळसा वाहतूक करत असते यामुळे या नागरी वाहतुकीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रत्यावर तलावापेक्षा मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यानमुळे विद्यार्थी, रुग्ण, खेडेपाड्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावे लागते. हा रस्ता दुरूस्त व्हावा आणि या मार्गावरून जाणार्याग अवजड वाहनांना मनाई करण्यात यावी या मागणीसाठी महादेव पाटील दोन दिवसांपासून उपोशणाला बसले होते.

उपोषणाला विविध संघटनांनी दर्शविला होता पाठिंबा
दिघी पोर्ट विस्तारित होण्याआधी तेथून वाहून नेणार्याय मालासाठी त्या क्षमतेच्या रस्त्याचे’ निर्माण करणे अपेक्षित होते, मात्र नागरी वाहतुकीच्या रस्त्यावरून दिघी पोर्ट कडून जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नेते यांना हाताशी धरून बेकायदेशीर वाहतूक सुरु आहे. या बेकायदेशीर वाहतूकीमुळे पडलेल्या खड्ड्यामुळे माजी सभापती तथा शिवसेना नेते महादेव पाटील यांनी 24 जुलै पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. या आमरण उपोषणाला मुस्लीम समाज अध्यक्ष, माजी जी.प.सदस्य शामकांत भोकरे, किरण बाथम, विधानसभा संघटक शिव सहकार सेना, मिनीडोर चालक मालक संघटना, म्हसळा प्रेस कलूब सहित तालुक्यातील विविध संघटनांनी आपला पाठींबा जाहीर केला होता.

शिवसैनिकांचा आक्रमकतेमुळे प्रशासन हतबल
पहिल्या दिवशी कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त शिवसैनिकांनी रात्री बाराच्या सुमारास दिघी पोर्टच्या गाड्या आडवण्यास सुरवात केली. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासन हतबल झाले व तब्बल तीस तासानंतर रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरवात केली. महादेव पाटील यांना लेखी आश्वासन देऊन त्यांना उपोषण मुक्त केले. यावेळी रस्ते वाहतूक नियंत्रण मंडळाचे उपअभियंता सचिन निफाडे, इरीगेषणचे इंजिनिअर जगताप, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, प्रभारी शहर प्रमुख मुन्ना पानसरे, अक्रम साने, राजाराम तीलटकर, अमित महामुणकर, रीमाताई महामुणकर, नगरसेविका संपदा पोतदार,पांडुरंग सुतार उपस्थित होते.

या पोर्ट मधून होणार्‍या वाहतुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो यामुळे दिघी पोर्ट विरुद्ध मोठी कारवाई करण्यात यावी यासाठी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उचलणार.
– आमदार भरतशेट गोगावले

महादेव पाटील यांच्या सोबत संपूर्ण शिवसेना संघटना असून वेळ पडल्यास माझ्यासाहित प्रत्येक शिवसैनिक दिघी पोर्ट मध्ये जाणार्याप बेकायदेशीर गाड्या फोडून म्हसळा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देईल.
– नंदू शिर्के, तालुकाप्रमुख