उपप्रादेशिक कार्यालयाचे 29 रोजी भुसावळ येथे शिबीराचे आयोजन

0

जळगाव: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळ्राव यांचेमार्फत जनतेच्या सोयीसाठी तालुकास्तरावर मासिक दौरा आयोजित करुन शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते. भुसावळ तालुक्यतील जनतेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुस-या व तिस-या गुरुवारी शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.  तथापि, माहे सप्टेंबर 2018 मधील दुस-या व तिस-या गुरुवारी म्हणजे अनुक्रमे 13 सप्टेंबर 2018 व दि. 20 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय सुटी आल्याने या दिवशी भुसावळ येथील मासिक दौरा शिबीर कार्यालयांचे कामकाज होऊ शकलेले नाही.

जनतेच्या सोयीसाठी उक्त काळातील कामे करण्यासाठी मासिक दौरा शिबीर कार्यालयाचे आयोजन दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी करण्यात येत आहे. तरी भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी वाहन धारक/अनुज्ञप्ती धारक यांनी सदरची नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंत पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.