मुंबई : बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाक्षीने आपल्या इन्स्टाग्रामवर मेकअप करीत असल्याचा फोटो शेअर केला होता. त्याला अनेक कॉमेंट्स मिळाल्या. त्यात वरुण धवनने कॉमेंटमध्ये लिहिले होते ‘भाभी’.
वरणला उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, ‘उफ वरुण धवन. अपना मुंह बंद करोगे.’ आता सोनाक्षी आणि वरुणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओत सोनाक्षीच्या रुममध्ये वरुण धवन हातात चप्पल घेऊन येतो. तो आत येताच सोनाक्षीला आश्चर्य वाटते. ‘माझे चप्पल तुझ्याकडे कसे’, असे ती विचारते. त्यानंतर तो सोनाक्षीच्या पायाला हात लावून पाया पडतो. ती त्याला आशीर्वाद देते आणि त्याला विचारते की तू मला भाभी असे का म्हणाला होतास. या व्हिडिओतून वरुणने एक रहस्य निर्माण केले आहे.