मुंबई: शहरात उबेरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक होत असते. उबेर या ऍपमध्येही आता कोविड संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उबेरने त्यांचे ऍप अपडेट केले असून ज्यात कोविडची ही माहिती दिली गेली आहे. कोणता रस्ता प्रतिबंधित क्षेत्रात येत असून तिथून प्रवास करता येऊ शकतो का? कोणता रस्ता बंद आहे? ही माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच मास्क डिटेक्शन फिचर म्हणजेच ज्यात चालकाला प्रवास सुरू करण्यापूर्वी उबर ऍपमध्ये सेल्फी काढावा लागणार आहे. ज्याने चालक मास्कचा वापर करतो का? याची पडताळणी होईल. शिवाय, उबर ने रुग्णवाहिकेची सुद्धा सोय केली आहे.
शुक्रवारी उबरने मुंबईसह जागतिक पातळीवरील 150 हून अधिक शहरातील ऍपमध्ये बदल करुन मॅप्स अपडेट केले आहेत. ज्यामुळे, चालकाला गाडी सोप्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि जलद मार्गाने चालवता येईल.