उभरांडी येथील जिल्हा परिषद शाळेत सौर पॅनलचे उद्घाटन

0

निजामपूर । जिप शाळा उभरांडी ता. साक्री जि. धुळे येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई तसेच डिजिटल चळवळीचे प्रणेते हर्षल विभांडीक यांच्या सहकार्याने प्राप्त झालेल्या सौर पॅनलचे उदघाटन करण्यात आले. सुमारे 36 हजार रुपयांचा सौर पॅनल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई आणि हर्षल विभांडीक यांच्या सहकार्याने फक्त 12 हजार रुपये देऊन शाळेला प्राप्त झाले. ऊर्जेचा हा प्रकार अपारंपरिक स्वरूपाचा असून स्वछ, प्रदुषणविरहित, दिर्घायुष्यी आणि नविनिकरणक्षम असा आहे. अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ होते.

राज्रातील शाळांनी सौर ऊर्जेचा वापर करावा
प्रमुख अतिथी म्हणून हर्षल विभांडीक, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जिप सदस्य हर्षवर्धन दहिते, प्राचार्य अजय चांडाक, जिप सदस्या उषा ठाकरे, पस सदस्य साक्रीचे उत्पल नांद्रे, पस सदस्य वासुदेव बदामे, निजामपूर पोस्टेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खेडकर, सरपंच विनिता साळवे, प्रदीप नांद्रे, अशोक देसल ,हस्ती बँक शाखा निजामपूर चेअरमन पंडित मुरलीधर वाणी, डॉ. रमाकांत शिरोळे, जेष्ठ पत्रकार रघुवीर खारकर, मिलिंद भार्गव, युसुफ दादा भंडारी रवींद्र धानोरे, नारायण सावळे, संतोष सावळे, संतोष सावळे, उभरांडी गावाचे नागरिक तसेच दुसाने केंद्राचे सर्व मुख्याध्यापक-शिक्षकबंधु-भगिनी आणि निजामपूर जैताणे परिसरातील अनेकय शिक्षाकमित्र उपस्थित होते. जिप शाळा उभरांडी आणि जिप शाळा वाजदरेच्या सौर पॅनलचे उदघाटन फित कापून मान्यवरांनी केले.हर्षल विभांडीक यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शाळांनी सौर उर्जेचा वापर करावा. यासाठी सर्वतोपरी ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. अजय चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात गणेश मिसाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.