जळगाव। पत्ता विचारण्यासाठी बाजूलाच उभ्या केलेल्या कारला मागून भरधाव वेगात येणार्या इंडिकाने जोरदार धडक दिली. ही घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जेडीसीसी बँकेसमोर घडली. वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.
शहरातील सत्यवल्लभ सभागृहात कार्यक्रम असल्यामुळे औरंगाबाद येथील एक कुटूंबिय कारने (क्रं. एमएच.20.डीव्ही.1387) ने जळगावसाठी निघाले होते. दुपारी शहरात आल्यानंतर सभागृहाचा पत्ता माहित नसल्याने रिंगरोडवरील जेडीसीसी बँकेच्या समोरच एका बाजुला त्यांनी कार थांबवून जवळच उभ्या असलेल्या नागरिकांना सभागृहाचा पत्ता विचारला असता मागुन भरधाव वेगात येणार्या इंडिका (क्रं. एमएच.19.एक्स.007) ने त्या कुटूंबियांच्या कारला मागून जोरदार धडक दिल्याने मागच्या बाजुली डिक्की दाबली गेली तर इंडिकाचेही बोनटचे नुकसान झाले. त्यानंतर कारचालकाने इंडिकासह चालकाला जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घेवून येत पोलिसांच्या ताब्यता दिले. यासोबतच दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली.