उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळून तरुण ठार

0
भुसावळ- भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकलेल्या हतनूर येथील 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मयूर चुडामण कोळी (25, रा.हतनूर) हा तरुण दुचाकीने भरधाव वेगाने जात असताना तळवेल फाट्याजवळील भाग्यश्री लॉनजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळला. धडक ईतकी जोरदार होती की मयूरचा जागीच मृत्यू झाला. वरणगाव पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.