चाळीसगाव-उमंग समाजशिल्पी महिला परिवार व उमंग सृष्टी स्कूलतर्फे विविध उपक्रमांतर्गत बालगोपाळ व पालकांसाठी दिपावली निमित्ताने विनामुल्य किल्ले बनविणे प्रशिक्षण व दिवा सजावट कार्यशाळा २८ ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर २०१८ रोजी सुवर्णाताई उद्यान व उमंग सृष्टी प्री-प्रायमरी स्कूल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी किल्ले बनविण्याचे व दिवा सजावट प्रशिक्षण घेतले.
यात विद्यार्थ्यांनी मनमोहक किल्ले बनविले तसेच दिवाळीच्या दीपोत्सवासाठी आकर्षक दिवांची सजावट देखील केली यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
यावेळी उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यात महाराष्ट्राची ओळख ही पराक्रम व संघर्षातून किल्ले जिंकणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे. माती व किल्ले यांचा संबंध शौर्य व पराक्रमाचे प्रतिक आहे. असे मत संपदाताई पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वसुंधरा फौंडेशनचे संस्थापक सचिन पवार व भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी उपस्थिती दिली. या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख ललिता पिंगळे यांनी किल्ल्यांविषयी माहिती दिली.
कार्यशाळेचे विशेष प्रशिक्षक सागर मोरे यांनी सोप्या भाषेत किल्ला कसा तयार करायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे सहकारी मित्र मित्र महेंद्र पाटील व राजू भूईकर यांनी उपस्थिती दिली. तसेच न.पा. बांधकाम विभागाचे वाघ साहेब यांनी देखील कार्यशाळेस उपस्थिती दिली. किल्ले बनविण्याच्या प्रशिक्षणात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. यात अभिनव शाळा, सरस्वती विद्यालय, सेंट जोसेफ स्कूल, उमंग सृष्टी स्कूल तसेच उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा राजपूत, सचिव सौ. निता चव्हाण, समन्वयिका विजया पाटील, सरला येवले, तसेच उमंग कोअर ग्रुप व इतर सदस्या देखील सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी विजया पाटील, दामिनी वाघ, विजया भोकरे, जया महाले, योगिता एरंडे, अर्जुन पाटील, भगवान बच्छे यांनी परिश्रम घेतले.