उमंगतर्फे पोलीस स्टेशन व पालिकेला भेट

0

अमळनेर । पोलीस प्रशासनतर्फे शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे कार्य केले जाते तर नगरपालिकेतर्फे शहरात सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जाते. दोन्ही विभागाचे कामकाज हे जनतेसाठी असल्याने या विभागात होत असलेल्या कामाबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. या उत्सुकतेने आणि कुतुहलाने चाळीसगाव शहरातील उमंग सृष्टी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी 9 रोजी पोलीस स्टेशन व नगरपालिकेला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक खडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन तेथील जेल, जेलमधील गुन्हेगार, कैदी यांची यांच्या विषयी समजेल आशा भाषेत मार्गदर्शन केले.

नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांचा सत्कार
बंदुकीचे सर्व प्रकारांविषयी माहिती दिली 8047 रायफल व वॉकी टॉकीचा उपयोग कसा केला जातो हे समजावून सांगितले. तहसीलदार कैलास देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी उमंग सृष्टी स्कुलच्या अध्यक्षा संपदाताई पाटील, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नगरपालिका भेटीप्रसंगी नगराध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला. यात गोपनीय शाखेचे गणेश पाटील, मधुकर जाधव यांनी सहकार्य केली. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटण्यात आले. उमंग स्कूलच्या अध्यक्षा संपदाताई पाटील, शिक्षक, प्रशासनाचे आभार मानले.