चाळीसगाव : सृष्टी कौशल्य विकास केंद्र आणि उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे महिलांसाठी स्वास्थ्यातून सौंदर्याकडे कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला त्वचारोगतज्ञ डॉ. प्रमोद ओस्तवाल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. ओस्तवाल यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आहार कोणता घ्यावा. त्यात प्रामुख्याने अँनेमिया व कॅल्शियम डेफीसिएन्सी बाबत महिलांसाठी उत्कृष्ठ मार्गदशन केले. आहार-विहार यातून वजन कमी करण्याच्या टिप्स त्यांनी यावेळी सांगितल्या. डॉ.ज्योती पाटील यांनी देखील महिलांनी आहार-विहार यातून सौंदर्य टिकविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्योती पाटील, सुवर्णा राजपूत साधना पाटील, व इतर गट समन्वयीका यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आहाराबरोबरच सकस बौद्धिक वाचनाची आवश्यकता
चाळीसगावातील प्रत्यक स्त्री आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावी म्हणून सकाळचा नस्ता, जेवण, रात्रीचे जेवण या संबधीचे महिलांचे गैरसमज त्यांनी काढून आहाराबद्दल महिलांनी जागृत असावे. तसेच महिलांच्या चेहर्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी सनस्क्रीन, मोस्च्युरायजर याविषयी देखील सखोल माहिती देण्यात आली. शरीरात आहाराबरोबरच आवश्यक असणारे सप्लीमेट गोळ्यांच्या स्वरुपात घ्याव्या लागतात. ह्या औषधी कुठल्याही वयात घेता येतात याविषयी तज्ञ डॉकटरांचा सल्ला घेणे आवश्यक असतो. वयाच्या 80 व्या वर्षी देखील लता मंगेशकर आरोग्याच्या दृष्टीने फिट आहेत. व त्यांचा आवाज आज देखील तरुणच आहे. या प्रमाणे अनेक उदाहरणे देवून डॉ. ओस्तवाल यानी महिलांना माहिती दिली व महिलांच्या शंखेच निरसन केले. आहारात सकाळी नास्त्यात फळे, सालाड यांचा जास्तीत जास्त वापर करून रात्री अल्प भोजन घ्यावे. तसेच पाणी देखील तेवढेच शरीराला भरपूर प्रमाणात आवश्यक असते त्यामुळे व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजेश ठोंबरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना चांगले आचार-विचार व सकारात्मकता मानवाला सुदृढ बनविते. आहाराबरोबरच सकस बौद्धिक वाचन या सर्व गोष्टीनी देखील महिलांनी स्व:तचा सर्वांगीण विकास करायला हवा. आपल्याकडे जे-जे काही चांगले विचार असतील ते इतरांना मांडण्याचा प्रयत्न करावा.
महिलांना दिले अवयव दानाचे धडे
महिलांनी नेत्रदान व अवयव दान करून समाजात एक चांगला पायंडा घालण्याचा संदेश दिला. देहदानाचे महत्व पटवून देताना समाजाचे थोडेफार ऋण आपण फेडू शकतो. यावेळी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी समाजशिल्पी महिला परिवारातर्फे अवयवदान व देहदानाविषयी अर्ज भरून देण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपदा पाटील यांनी महिलांचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी आहारातील फळे, भाजीपाला सेवनाचे महत्व पटवून दिले. तसेच अँनेमिया चे प्रमाण किशोरवयीन मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे व त्याचे निराकरण करण्यासाठी डॉक्टरांचा योग्यवेळी सल्ला घेणेबाबत उपाय करता येतो असे सांगितले.