चाळीसगाव। शहरातील उमंग सृष्टी प्री प्रायमरी स्कूलमध्ये शनिवारी 11 रोजी वित्तीय साक्षरता प्रकल्प उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वित्तीय संकल्पना समजावी म्हणून हा प्रकल्प घेण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पैशांचे तसेच खरेदी विक्री चे समीकरण समजाविण्यात आले व त्यासाठी प्रात्यक्षिक शाळेतच घेण्यात आले. म्हणजेच विद्यार्थी व पालक मिळून त्यांनी विविध शालेय उपयोगी वस्तूंचे, साहित्याचे स्टॉल लावले होते. त्यातच इतर विद्यार्थ्यांनी खरेदी केली व यातूनच त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या व विद्यार्थ्यांचे मनोरंजनही झाले. या प्रकल्पात मुलांना मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेनुसार कार्यक्रमांचा आनंद उपभोगला त्याचप्रमाणे पालकांनी देखील या प्रकल्पाला प्रतिसाद दिला.
कु. जीनल शहा यांनी संगणक सदरी करणात चलन समजावून सांगितले. संपदा पाटील यांनी मुलांना समजेल आशा भाषेत समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील होतया. फैयाज शेख, अर्जुन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कु.जीनल शहा, कु.भाग्यश्री न्यास, सौ वृषाली पाटील, कु.वैष्णवी पवार, मनोहर सोनावणे, उल्हास पाटील, भगवान बच्छे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.