चाळीसगाव। उमंग सृष्टी प्री-प्रायमरी स्कूल आणि उमंग समाजशिल्पी महिला परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच महिला परिवाराच्या सदस्या देखील आवर्जून उपस्थित होत्या. संपदाताई पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
प्रशिक्षणास कुसुमजी राजपाल यांनी उपस्थितांना योगा, प्राणायाम याबाबत प्रशिक्षण देवून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अतिशय सविस्तर माहिती देखील सांगितली. प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम महत्वाचा आहे. कुटुंबातील लहान पासून मोठ्या व्यक्तींपर्यंत योगा आवश्यक केला पाहिजे, असे मत यावेळी प्रशिक्षक कुसुमजी राजपाल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा सुवर्णा राजपूत यांनी प्रशिक्षकांचे आभार मानले व योग साप्ताह प्रशिक्षणाला उपस्थित उमंग महिला सदस्यांचे तसेच कोअर टीमचे देखील आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधना पाटील, जीनल शहा, पूर्वी महाजन, वृषाली पाटील, शीतल पाटील, भाग्यश्री व्यास, अर्जुन पाटील, सुहास पवार, भगवान बच्छे, मनोहर सोनवणे, उल्हास पाटील, मनीषाताई, शालिनीताई यांनी परिश्रम घेतले.