नवापुर। मौजे उमराण ता नवापुर येथील उमराण ते चिंचपाडा रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी होणे बाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे यांना आदिवासी ब्रिगेड सेना नवापुरतर्फे देण्यात आले आहे. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, मौजे उमराण गावाजवळ दर्शनी भागात उमराण ते चिंचपाडा रस्ता आहे. या रस्त्यावर पुलाचे (फरशीचे) काम झाले आहे. ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. पाईप मोरी तुटली फुटली होती तो भाग राहु दिला व चांगल्या भागात काम केलेले आहे.महत्वाचे म्हणजे नाल्याचा प्रवाह दुसरीकडे असुन त्यांचा बाजुला बांधकाम करण्यात आले आहे.
निष्कृष्ट कामांमुळे अडचणी
बांधकामाचा मटेरियल खालच्या प्रतीचा वापरला आहे. यामुळे पुलाचे साईट कटटे आताच तुटले आहेत. अत्यंत खालच्या दर्जाचे निकृष्ठ असे काम केलेले आहे. यामुळे पुर्ण गाव-पाडयातील लोकांना अडचणी येत आहेत विशेष म्हणजे थोडयाच अंतरावर साखर कारखाना आहे. कारखाना चालु झाल्यावर याच रस्त्याने जडवाहणे ये-जा करतात त्यामुळे शेतकर्यांचे व कारखान्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
यांची होती उपस्थिती
मुल्यांकनपेक्षा कमी किंवा जास्त खर्च केला याची चौकशी व्हावी तसेच पुलाच्या कामात दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर उमराण सरपंच राजु वसावे,माजी पं.स सदस्य सुभाष वसावे, सविता वसावे,किरण वळवी, प्रविण वसावे,पंकज वसावे, सुनिल वळवी, लगीनदास वळवी, विवेक वळवी,राहुल पाडवी, भालचंद्र वळवी, संजय वसावे,प्रदिप वळवी,संदिप पाडवी,प्रफुल वसावे, गुलाबसिंग वसावे, मजनु पाडवी,दासु वसावे,जयंत वळवी, रोशन वसावे,दानियल वळवी,महेश वळवी, दिलीप पाडवी, रामदास वळवी,काशीराम वसावे यांचा सह्या