उमर्देत गटारीचे बांधकाम निकृष्ट परीसरातील नागरीकांचा संताप

0

नंदुरबार । ग्राम विकासाच्या योजनेतून तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे इंदीरानगर भागात 2015 मध्ये अंतर्गत गटारींसाठी लाखो रुपयांचा निधीतून गटारीचे काम करण्यात आले. मात्र बांधकामात गैरव्यवहार झाल्याने सदर गटारीला माती टाकून बंद करावे लागलेे. शासनाचा लाखो रुपयांचा वापर कुठे आणि कसा झाला याबाबत कोणतीही माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलण्यात येत आहे. देशात स्वच्छतेचा नंदुरबार तालुक्यात अंतर्गत गटारीचे कामे सुरू आहेत.

बांधकाम करून एका महिन्यात गटारी नाहिशी
उमर्दे गावात इंदिरा नगर भागात गटार तयार करण्याबाबतचे सर्व नियम धाब्यावर ठेवल्याने एका महिन्यातच नाहीशी झाली, शासनाचा लाखोंच्या निधिवर मात्र माती टाकण्यात आली. याकडे मात्र ’मेरी भी चुप अन तेरी भी चुप’ असा प्रकार झाल्याणे गटारीत माती टाकून बंद करण्यात आले. सदर गटारीचे बांधकाम करतांना बांधकामाबाबतचे सर्व नियम मोडून कोणताही नियमानुकूल आराखडा तयार करण्यात आला असून ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी स्वतःच कामे केले असल्यामुळे कुठलीही निविदा जाहिर करण्यात आलेली नाही. मात्र सदरच्या गटारीला अभियांत्रिक साचा नसल्याने गटारीतुन सांडपाणी बाहेर न निघता मध्यभागी जमा होत असल्याने गटारीच्या दोन्हीही बाजूने पानी साचून त्रास आरोग्यावर होऊन विविध आजरांना तोंड द्यावे लागत होते. हा गलथान कारभार बाहेर येऊ नये म्हणून सदरची गटार माती, मुरूम टाकून बंद करण्यात आली.