एरंडोल:– येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावरील म्हसावद रस्त्यालगतच्या उमर्दे येथे १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निलेश पांडुरंग पाटील (वय ३०) या युवकाने राहत्या घरात पुढच्या खोलीमध्ये छताच्या लोखंडी कडीला वायरची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पिंपरी बुद्रुक येथे दिव्या संजय पाटील (वय १६) या शाळकरी मुलीला घरी विषबाधा झाल्याने तिला उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला कागदपत्र प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत विखरण येथे अशोक जगन पाटील वय ४० वर्षे या इसमाने सहा सप्टेंबर २१ रोजी रात्री विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता १०सप्टेंबर रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील, श्रीराम पाटील, काशिनाथ पाटील, अखिल मुजावर, संदीप सातपुते, राजेश पाटील, पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.