उमर अब्दुल्ला यांची टीका

0

श्रीनगर – सर्जिकल स्ट्राईक संबंधी मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली असून न्यूज चॅनेलच्या अँकरने अपमानजनक प्रश्न विचारला म्हणून सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली, याला काय म्हणायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. असले निर्णय करणार्‍यांच्या हाती आपण सुरक्षित असल्याची भावना आपण जोपासणं अपेक्षित आहे का? असे ही मत त्यांनी असं ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.