उमविकडून अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

0

जळगाव  । कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घेत प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी.एस.डब्ल्रु. आणि इतर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी तसेच एम.ए. व एम.कॉम भाग- 1 अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिरेस दि. 4 सप्टेंबर, 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी.एस.डब्ल्रु. आणि इतर पदवी स्तरावरील अभ्यास क्रमांसाठी तसेच एम.ए. व एम.कॉम भाग- 1 अभ्यास क्रमांची प्रवेश प्रक्रीयेस 4 सप्टेंबर, 2017 पर्यंत मुदतवाढीस कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

सदरची प्रवेश प्रक्रीया विद्यापीठाने मान्यता प्राप्त दिलेल्या प्रवेश क्षमतेच्या व इत्यादी अटींच्या अधिन राहून मुदतवाढ दिल्याचे विशेष कार्य अधिकारी प्रा.डॉ. पी.पी. माहुलीकर यांनी कळविले आहे.