उमविच्या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उद्घाटन

0

जळगाव प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

आज सकाळी विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर राज्यपाल राव हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे रवाना झाले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे राज्यपाल राव यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर ते जैन हिल्स येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत. तर दुपारी सव्वादोन वाजता ते विमानाने यवतमाळ येथे प्रयाण करणार आहेत.