उमवितर्फे स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर

0

पिंपळनेर । उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ्याच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने रोकडविरहित सोसायटी निर्माण करण्यासाठी जनजागृती करणार्‍या राष्ट्रीय सेवा योजनाच्या पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. केंद्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्य रोकड विरहित व्हावे या धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यापीठे महाविद्यालये यामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी समन्वयक स्वयंसेवकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषगाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व परीसंस्थामधील रासेयोच्या विद्यार्थीसाठी रोकडविरहित महाराष्ट्राचे विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कार योजना राबण्यात आली.

वाघ व चव्हाण यांना पुरस्कार
विद्यापीठातर्फे रोकड विरहित महाराष्ट्र धोरण राबविण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी केलेल्या कामाच्या आधारावर त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. तरी ग्रामीण भागातील पुरस्कार उत्तमराव पाटील महाविद्यालयाचे स्वयंसेवक महावीर वाघ व मयूर चव्हाण यांना जाहीर झाला. ह्या स्वयंकांना दत्तक गाव छडवेल पखरून आणि दहिवेल परीसातील नागरिकांना एटीएम, पेटीएम मनी ट्रान्स्फर हे सगळे त्यांनी प्रात्यक्षिक करून नागरिकांना जागृत केले होते हे यश संपादन केल्यावर संस्थेचे प्राचार्य एल.के.नांद्रे व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.