उमवितील प्रा.संदीप केदार, प्रा. राहुल कापुरे यांना निरोप

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात गेल्या 3 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक संदीप केदार व राहुल कापुरे यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.तुकाराम दौड, डॉ.सुधीर भटकर तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. दौड यांनी आपल्या मनोगतात संत तुकाराम महाराज यांच्या ओव्यांना उजाळा देत आम्ही जातो आमच्या गावा आमुचा रामराम घ्यावा, असे सांगून प्रशासनाच्या ध्येय धोरणानुसार आपला या विभागातील कार्यकाळ संपला आहे. मात्र इथून पुढे उज्जवल भविष्याचा काळ सुरु होईल त्या दिशेने आपण मार्गक्रमण करावे असे म्हणत दोन्ही प्राध्यापकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

निरोपाच्या वेळी दोघेही भावूक
ज्याची शब्द ना बोलती त्याची बोलती आसवे, ज्याची बोले ना आसवे त्याची बोलती ह्रदयाची स्पंदने यावेळी मनोगत व्यक्त करताना संदीप केदार व राहुल कापुरे यांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. दरम्यान विद्यार्थ्यांनी दोन्ही प्राध्यापकांना भेट वस्तू देऊन भावपूर्ण निरोप दिला. यावेळी ज्ञानेश्वर थोरात,प्रवीण ब्राम्हणे,वसंत कुलकर्णी,सचीन गोसावी,प्रियंका ठाकूर, अभि पारधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कायम स्मरण रहावे यासाठी केले वृक्षारोपण
विद्यार्थ्यांना विद्यार्थी होऊन शिकवण्याची कला जाणणारे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी सोडून जातात. रोपटे रुपी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पाणी पाजून आकाशात डोलण्या इतपत वृक्ष रुपी तयार करण्याची मेहनत घेणारे संदीप केदार व राहुल कापुरे यांनी जाता जाता विभागाच्या प्रांगणात वृक्षरोपण केले. त्यांच्याहस्ते करण्यात आलेल्या वृक्षारोपनाद्वारे ते कायम स्मरणात राहणार आहे.